पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 22, 2020

पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू


अकोला : राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच  असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसावर कोरोनाचे संकट गडत होत असून केवळ अकोलेकरांच्या निष्काळजीमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर ही धोक्याची सावट आहे

आर.पी. टी.एस. अकोला येथे कार्यरत पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू  नथुजी खेडेकर यांचे कोरोनाविषाणू कोविड-१९ मुळे  सोमवारी (ता.२१) निधन झाले.त्यांच्यावर 13 सप्टेंबर पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते.राजू खेडेकर यांना कोरोणा ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्यांना जीएमसीमध्ये ता.13 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार केले जात होते. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली. राजू खेडेकर यांना एक मुलगा आहे. त्यांनी पीटीएस , सिटी कोतवाली पोलीस ,मुख्यालय काम केले आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरणारे हे कोरोनाचे वाहक ठरू शकतात . पर्यायाने पोलिसांनाही करू नका धोका निर्माण करीत आहे

Post Top Ad

-->