शेगाव शहर पोलीसांची कामगीरी, वेगवेगळया कंपनीचे 25 नग मोबाईल जप्त
बुलढाणा : मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. यामध्ये पोलिसांच्या डीबीपथकाने कसून तपास करून अकोला जिल्ह्यातील एका सराईत मोबाईल चोरट्याला अटक केली दरम्यान त्याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने शेगाव शहरात केलेल्या आतापर्यंतच्या चोरीच्या घटनांचा उलगडा केला असून त्याच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी वेगळ्या कंपन्यांचे 25 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
अजय रतन पळसपगार वय 26 वर्ष रा गणोरी ता.जि.अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर आरोपीवर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल चोरी सह विविध गुन्हे दाखल असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात मागील काही ही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामध्ये शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने एका मोबाईल चोरीच्या गुन्हा मध्ये तांत्रिक साहाय्य घेत अकोला जिल्ह्यातील आरोपी अजय पर्यंत पोहोचले दरम्यान त्याला अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आतापर्यंत शेगाव शहरातून 25 मोबाईल चोरल्याची कबुली दिली असून सदर मोबाईल पोलिसांनी त्याच्या गणोरी जिल्हा अकोला या गावातीळ घरून हस्तगत केले आहे. जप्त करण्यात आलेले मोबाईल ज्यांचे असेल त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाज पोलिसांनी केले आहे.