बुलढाणा : मेहकर तालुक्यातील बेलगाव परिसरात गावठी दारू वरीली मटका अवैध धंदे जोमात सुरू आहे या धंद्यांना पोलिसांच्या वरदहस्त असल्याची चर्चा असल्याचे बोलल्या जात आहे. कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त होत आहे तालुक्यातील बेलगाव गावात व शेतात व परिसरात गावठी दारू जोमात सुरू आहे या अवैध धंद्यांना पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा असल्याने परिसरात जनतेच्या मनात पोलीस पोलिसांच्या वरचा विश्वास उडत असल्याचे दिसून येत आहे मागील काही महिन्यात पासून कोरोना चा सहारा घेत हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत याकडे स्थानिक ठाणेदार यांचा कुठलाच लक्ष नसल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत हॉटेल ढाब्यावर सहजतेने मिळणार्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या अधीरी गेण्याचे चित्र असून अवैध धंद्यांचा पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत तर या सर्व प्रकाराकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे
त्यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस अशी गुळगुळीत भूमिका घेऊन चालणार नाही
डोणगाव पोलिसांना व स्थानिक बीट आमदारांना कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न आता जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास आत्ताच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे घालून येथील धंद्यांना आळा घालण्यासाठी मागणी करून असे शांतताप्रिय नागरिकांनी सांगितले