बाप लेकीच्या नात्याला काळीमा! बापानेच केला पोटच्या दोन मुलीवर अत्याचार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 21, 2020

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! बापानेच केला पोटच्या दोन मुलीवर अत्याचार



वर्ध्यातील आर्वीत बापानेच आपल्या पोटच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

वर्धा : बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना वर्ध्यातील आर्वीत घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा कुंटुब मुळचा नागपूरातला असून काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत आर्वीत वास्तव्यास आले होते. काही दिवसांपूर्वी या वडिलांने आपल्या दोन्ही मुलींना नागपूरला आजीकडे सोडून दिले होते. तिथे मोठी मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीला विश्वासात घेतल्यानंतर विचारणा केली असता; दोन्ही मुलींनी वडीलचं आपल्यावर अत्याचार करत असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, मुळ प्रकरण आर्वीचे असल्याने हे प्रकरण आर्वी पोलीसांकडे सुपुर्द करण्यात आला आहे. पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी नराधम बापाला अटक केली आहे.

Post Top Ad

-->