एमएचटि सिईटी सामाईक प्रवेश परिक्षेसाठी नियोजन सभा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 28, 2020

एमएचटि सिईटी सामाईक प्रवेश परिक्षेसाठी नियोजन सभा


अकोला,दि. 28 (जिमाका)- अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अकोला येथे एमएचटी सिईटी -2020 सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेमार्फत ऑनालाईन पध्दतीने एकूण तीन केंद्रावर आयोजित केलेली आहे. सदर परीक्षेच्या नियोजनाकरीता शासनस्तरावरुन जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीची परीक्षेच्या नियोजनाकरीता व परीक्षेच्या कामामध्ये समन्वये राखण्याकरीता आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षेतेखाली सभा आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

परीक्षेकरीता एकूण तीन परिक्षा उपकेन्द्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सूचना देण्यात आला. परिक्षा उपकेंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होवू नये व परीक्षा ही शांततेत पार पाडण्याकरीता परीक्षा उपकेंद्रावर 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. केन्द्रावर नियुक्त केंद्रप्रमुख यांचे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण 30 सप्टेंबर रोजी लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येईल. परिक्षेच्या नियोजनाकरीता व केंद्रांना भेटी देण्याकरीता पाच वाहने अधिग्रहीत करण्यात येतील. परीक्षा केंद्रावर भौतीक सुविधेबाबत उदा. लाईट, पंखे पाण्याची व्यवस्था इ. सर्वेक्षण करण्याकरीता जिल्हा संपर्क अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. परीक्षेकरीता पात्र उमेदवारांकरीता जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याकरीता कोणाताही त्रास होणार नाही याकरीता एस.टी. बसेस बाबत आगार व्यवस्थापक अकोला यांना कळविण्यात आले आहे. परीक्षा ही ऑनलाईन असल्यामुळे परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा अखंडीत ठेवण्याबाबत अधिक्षक, महाराष्ट्र विद्युत कंपनी यांना कळविलेले आहे. परीक्षा सुव्यवस्थित पार पाडण्याकरीता संबंधित तीन परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख यांना सहायक यांचे आदेश करण्यात येतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Post Top Ad

-->