नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू ; अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घटना - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 25, 2020

नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू ; अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घटना

 


अमरावती -
 लॉकडाऊन काळात मामाकडे सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावावर काळाने घाला घातला आहे. नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शहानुर नदीपात्रात घडली. दर्शन गायगोले (वय 15) व दिवेश गायगोले (वय 16) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने दर्शन व दिवेश हे दोन्ही सख्खे भाऊ मामाकडे सुट्या घालवण्यासाठी आले होते. आज दुपारच्या सुमारास हे दोघेही भाऊ धनेगाव येथील शहानुर नदीपात्रात आंघोळ करायला गेले. दरम्यान, पोहताना ते थोड्या लांबवर असलेल्या डोहात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोध पथकाला कळवले. त्यानंतर, शोध पथकाद्वारे दोन्ही भावांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह मामाकडे शोककळा पसरली आहे

Post Top Ad

-->