जिल्ह्यात चोवीस तासात ४१ मृत्यू तर ९७१ नवे रुग्ण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, September 26, 2020

जिल्ह्यात चोवीस तासात ४१ मृत्यू तर ९७१ नवे रुग्ण


५,५९५ चाचण्या, १,३१८ करोनामुक्त

नागपुरात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. शुक्रवारी दिवसभरात ४१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून प्रथमच हजारापेक्षा कमी ९७१ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात ५ हजार ५९५ चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये शहरातील ३ हजार ११९ तर ग्रामीणच्या २ हजार ४७६ जणांच्या चाचण्यांचा समावेश आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली असून १ हजार ३१८जण उपचारानंतर दिवसभरात घरी परतले आहेत.

सध्या १५ हजार ७९१ सकारात्मक रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये १३ हजार १९३ शहरातील असून २ हजार ५९८ रुग्ण ग्रामीणचे आहेत.

शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ४१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये २१ शहरातील असून १५ ग्रामीणचे तर ५ जिल्ह्याबाहेरील आहे. तर नव्या रुग्णांपकी ६५९ शहरातील तर ३०७ ग्रामीणचे तसेच ५ जिल्ह्याबाहेरील आहे.त्यामुळे जिल्ह्यात करोना बाधितांची एकूण संख्या ७२ हजार ८९९ वर गेली असून आजपर्यंत २ हजार ३०२ रुग्ण दगावले आहेत.

आजपर्यंतच्या एकूण ७२ हजार ८९९ बाधितांपकी १४ हजार ३२३ रुग्ण नागपूर ग्रामीणमधील असून ४०१ जिल्ह्याबाहेरील आहेत.विशेष म्हणजे दिवसभरात नवे रुग्ण आढळलेल्या संख्येपेक्षा करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

दिवसभरात १ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नागपुरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.१८ टक्के आहे.

Post Top Ad

-->