जिल्ह्यात 66 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 44 जण कोरोनामुक्त - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, October 23, 2020

जिल्ह्यात 66 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 44 जण कोरोनामुक्त


एका कोरोनाबाधिताचा मृत्यु

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात 66 जण नव्याने पॉझेटिव्ह असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 501 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 66 नव्याने पॉझेटिव्ह तर 435 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 399 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9822 झाली आहे. आज (दि.23) 44 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8723 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 314 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 87812 नमुने पाठविले असून यापैकी 87180 प्राप्त तर 632 अप्राप्त आहेत. तसेच 77358 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Post Top Ad

-->