करोना बाधितांची संख्या ८० हजारांच्या उंबरठय़ावर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, October 2, 2020

करोना बाधितांची संख्या ८० हजारांच्या उंबरठय़ावर


२४ तासांत ३६ मृत्यू; १,०३१ नवीन बाधित

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ३६ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर १ हजार ३१ नवीन बाधितांची भर पडली. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या आता थेट ८० हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे.

नवीन बाधितांमध्ये शहरातील ७०८, ग्रामीणचे ३२०, जिल्ह्य़ाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभऱ्यात शहरात २९, ग्रामीण ४, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ३६ मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या १ हजार ८५४, ग्रामीण ४४४, जिल्ह्य़ाबाहेरील २४८ अशी एकूण २ हजार ५४६ वर पोहचली आहे. दिवसभऱ्यात शहरात ६ हजार ३०० चाचण्या झाल्या.

त्यात शहरातील ५ हजार २४३, ग्रामीणच्या १ हजार ५७ चाचण्यांचा समावेश होता. दरम्यान, शहरात गेल्या आठवडय़ाभरापासून चाचण्यांची संख्या कमी झाल्याने बाधितांची संख्या कमी होऊन सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

सध्या शहरात ९ हजार ३४६, ग्रामीणला ३ हजार ४८७ असे एकूण १२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ३ हजार ४१७ रुग्ण विविध  रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ८ हजार ३८५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

करोनामुक्तांची संख्या ६३ हजार पार

जिल्ह्य़ात २४ तासांत ९४०, ग्रामीणला २५७ असे एकूण १ हजार १९७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६२ हजार ६७४, ग्रामीणला १५ हजार ९३९ अशी एकूण ६३ हजार ६६४ वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण हे ८०.५५ टक्के आहे.

मेडिकलला ४०० खाटा वाढवण्यासाठी धावपळ

मेडिकलमध्ये करोनाबाधितांसाठी आणखी ४०० खाटा वाढवण्यात येणार आहेत. कोणते वार्ड वापरावे जेणेकरून इतर आजाराच्या रुग्णांना संक्रमणाचा धोका जास्त राहणार नाही, यासाठी गेल्या काही दिवसांपासून येथे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे

Post Top Ad

-->