डोणगांव येथील दिव्य ज्योत सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यांचे वतीने महात्मा गांधीजी व लालबहादुर शास्ञी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन अजय इंगळे सामाजिक कार्यकर्ते हे लाभले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागरभाऊ बाजड,आकाश बाजड सचीव व सोमेश्वर निंबेकर,अक्षय संगवई सद्स्य विशालजी कोषाध्यक्ष हे देखील उपस्थितीत होते यावेळी संस्थेचे सचीव आकाशजी बाजड यांनी महात्मा गांधी यांच्या जिवनातील अनेक प्रसंग शब्दातुन मांडले व गांधीजी त्यांच्या आयुष्यात सत्य,अहिंसा यामार्गावरच चालले व त्यांनी इतर देशवासी यांना पण तीच शिकवण दिली आणी देशाला इंग्रजांकडुन स्वतंञ्य मिळावे या उद्देशासाठी सर्व आयुष्य खर्ची केले व इतरांना ही जिवन भर तीच शिकवण दिली.

आज देशाला स्वतंञ्य मिळाले असले तरी त्यात महात्मा गांधीजींचा सिंहाचा वाटा आहे असे ही ते म्हणाले आणी आपण गांधीजींनी सांगीतलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालुन देशाचे भविष्य घडवु शकतो असे मत उपस्थितीत युवकांपुढे मांडले आणी स्वतंञ्य भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्ञी यांचे देखील निर्णय क्षमता व देशातील सैनीकांना व शेतकर्यांना उर्जा देनारे शब्द जय जवान जय किसान आज ही देशातील नागरींकाना ऊर्जा देनारे आहे असे ही ते म्हणाले यावेळी नंदाताई बाजड,गौरीताई शेलगेवार,कविताई कोमटे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी आजी भुतेकर,रामेश्वर निंबेकर शिव स्वराज्य ग्रुप सद्स्य बश्वेश्वर स्वामी,विशाल डागर अखील भारतीय वाल्मिकी महापंचायतचे मेहकर तालुका अध्यक्ष, विकी डागर,ओम भालेराव,करण डागर,राहुल डागर,विष्णु श्रीनाथ,अक्षय काळे या कार्यक्रमाला अनेक युवक उपस्थीतीत होते.