बुलडाणा : राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागण्यांसाठी बुलडाणा जिल्हा मनसेच्या वतीने डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून गेला आहे. मका खरेदी केंद्र अद्याप सुरु झाले नाही ते सुरु करावे, पंचनामे न करता सरसकट खरीप पिकांची नुकसान भरपाई हेक्टरी 30 हजार रुपये द्यावी तसेच बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागण्यांसाठी हा निषेध करण्यात आला
शासनाला जागे करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष मदानराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर डोळ्याला काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन केला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.