यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, यवतमाळ नगर परिषदेच्या कंत्राटानुसार शहरातील सर्व कचरा साफ होण्यासाठी पालिकेने योग्य नियोजन करावे. पालिकेच्या कर्मचा-यांनी कंत्राटदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचे रेकॉर्डींग करणे आवश्यक आहे. कंत्राटदारांचे प्रतिनिधी तसेच त्यांच्याकडील कार्यरत स्टाफच्या नियमित बैठका घ्याव्या. पालिकेने कंत्राटदाराच्या निविदा प्रक्रियेत स्पष्टता ठेवावी. तसेच सध्या कार्यरत कंत्राटदाराने नवीन प्रक्रिया होईपर्यंत काम थांबवू नये. पुढील महिन्यात ही मुदत संपुष्टात येत असली तरी पूर्ण मुदतीपर्यंत काम करणे करावे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या घंटागाड्या सुस्थितीत ठेवाव्या. तसेच शहराच्या कोणत्याही प्रभागातून कच-याची तक्रार येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, आदी निर्देश दिले.
बैठकीला नगर पालिकेचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.