बुलडाणा,(जिमाका) दि.1: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यीता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येते. त्यानुसार देण्यात येणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावे. बचत गटांनी आपली 10 टक्के रक्कम मिळून मंजूर अनुदानामधून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही डिलरकडून सर्व चौकशी व तपासणी करून घेण्यात यावी.
सदर योजनेकरीता कोणत्याही बाह्यव्यक्तीची नेमणूक केलेली नाही तथा कोणत्याही बाह्य व्यक्तीशी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा यांचा कोणताही संबंध नाही. कोणत्याही स्वयं सहाय्यता बचत गटाने व त्यांच्या कोणत्याही सदस्याने परस्पर बाह्यव्यक्तीने सदर योजनेबद्दल कोणताही व्यवहार उघड केल्यास व त्यात फसवणूक झाल्याचे उघड झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अनुसूचित जाती व नवबौद्ध घअकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना अंतर्गत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अर्ज सदर कार्यालयात आवज जावक शाखेत सादर करावे. या योजनेसंबंधी कोणत्याही माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा व सदर योजनेचे समाज कल्याण निरीक्षक यांच्याशीच संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.