औरंगाबादमधून पैशाच्या वादातून हॉटेल चालकाचे अपहरण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 14, 2020

औरंगाबादमधून पैशाच्या वादातून हॉटेल चालकाचे अपहरण



 औरंगाबाद - हॉटेल सुरू करण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या वादातून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घडली. विकास वशिष्ठ फरताळे असे अपहरण झालेल्या, हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी विकासाच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. विकासाची सुटका करण्यासाठी सिटी चौक पोलिसांचे पथक बीडकडे रवाना झाले आहे

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी विकास फरताळे यांनी बीडमधील सावकाराकडून पैसे व्याजाने घेतले होते. वेळेवर पैसे देऊ न शकल्यामुळे बीड येथील सावकाराने तगादा लावला. पैसे वसूल करण्यासाठी सावकार आणि त्याचे सहकारी मंगळवारी विकास फरताळे यांचा शोध घेत होते. रजिस्ट्री ऑफिसमध्ये विकास असल्याची माहिती त्यांना मिळाली. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सावकार आणि त्याच्या साथीदारांनी विकासला भेटताच पैशाची मागणी केली. विकासाने पैसे नाही म्हणताच त्याला गाडीत डांबून घेऊन गेले. घडलेला प्रकार वडिलांनी सिटीचौक पोलिसांना सांगितला. या वरुन सिटीचौकचे पथक विकासाची सुटका करण्यासाठी बीडकडे रवाना झाले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

Post Top Ad

-->