पावसाचे महाराष्ट्रात होणार कमबॅक, शेतकऱ्यांची वाढली चिंता - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 14, 2020

पावसाचे महाराष्ट्रात होणार कमबॅक, शेतकऱ्यांची वाढली चिंता

 

मुंबई - पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसात महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे

दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील कोकणसह इतर भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे

गेल्या काही दिवसात राज्यात पाऊस थोडा बदलला होता. मात्र, हवामानात बदल झाल्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता आहे. सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह बरीच पिके घेतली आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे.

Post Top Ad

-->