डोणगांव :- केंद्र सरकार ने आणलेल्या वीज कायदा 2020 व उत्तर प्रदेश मध्ये करण्यात येणाऱ्या खाजगी करणा विरूद्ध आज पासून च्या संपा ला समर्थन देण्याकरिता महाराष्ट्र राज्य मधील वीज उद्योगातील संघटना कृती समितीच्या निर्णय नुसार डोणगांव.विद्युत केंद्रातील कर्मचारी यांनी कार्यालय समोर आज ५ आॅक्टोबर ला निषेध सभा घेण्यात आली.
सध्या राज्याच्या अखत्यारीत असलेल्या विज उद्योगाचे सूत्रे लवकरच केंद्र सरकारच्या स्वतःच्या ताब्यात घेवून खाजगीकरण करण्या चा कट करत असुन सुधारणा कायदा करत आहे केंद्र सरकारच्या या जण विरोधी धोरणाचा निषेध करून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता नॅशनल को ओरडीनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉइजे अँड इंजिनीअर च्या वतीने निषेधला हाक दिली
या हाकेला हाक देता डोणगांव येथील विद्युत केंद्रातील सर्व कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी यांनी आज 5/10/2020 ला संध्याकाळी ५ वाजता सब स्टेशन येथे कृती समितीने निषेध सभेचे आयोजन केले या वेळी संघटनेचे पदाधिकारी काॅम्रेट संदीप गव्हांदे यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिसिटी अमेडमेन्ट बिल 2020 चा प्रारूप आराखडा आखुन विज उद्योगाचे खाजगी करन करून विज महामंडळ हे खाजगी कंपन्यांना विकण्याचा कट आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आहे .तर यावेळी
काॅम्रेड संदीप गव्हांदे कॉम्रेड मुरलीधर गावंडे कॉम्रेड मन्नान मामु. कॉम्रेड बोरकर. कॉम्रेड खोडके. कॉम्रेड बदर व सुरक्षा रक्षक बोरकर ईतर करर्मचारी सहभागी होऊन निषेध व्यक्त केला .