ग्रा.पं. निवडणूक 2020-21 जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, December 18, 2020

ग्रा.पं. निवडणूक 2020-21 जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण


 ग्रा.पं. निवडणूक 2020-21 जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

अकोला,दि. 17(जिमाका)- जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर आज या निवडणूकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आज पार पडला. या वर्गाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.  यावेळी निवडणूक प्रक्रियेतील नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी, अर्ज माघारी, अंतिम उमेदवार यादी तयार करणे, चिन्ह वाटप ते मतदान, मतमोजणी या सर्व प्रक्रियांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. 

सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण परिपूर्ण घ्यावे. त्याद्वारे आपणास योग्य तो निर्णय घेण्यास मदत मिळते. आपल्या कार्यक्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखणे आदींबाबत माहिती घ्यावी व शंका निरसन करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनीही मार्गदर्शन केले. तहसिलदार विजय लोखंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आभार मानले.

यावेळी तहसिलदार विजय लोखंडे यांनी नामनिर्देशन पत्राबाबत आवश्यक बाबी व छाननी प्रक्रियाबाबतचे प्रशिक्षण दिले, ऑनलाईन नामनिर्देशनपत्राबाबत जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले व संगणक अभियंता  किशोर पहुरकर यांनी दिले, चिन्ह वाटप व मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण पातूरचे तहसिलदार दिपक बाजड यांनी दिले. तर मतदान यंत्र व मतपत्रिकाबाबतचे प्रशिक्षण नायब तहसिलदार अतुल सोनोने, तलाठी प्रशांत बुले व विशाल काटोले यांनी दिले तर आचारसंहितेबाबतचे प्रशिक्षण मुर्तिजापूरचे तहसिलदार प्रदिप पवार यांनी दिले.

Post Top Ad

-->