लोणार पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच आरोपी सह ८ टूव्हीलर जप्त..
दुचाकी चोरटे लोणार पोलिसांच्या जाळ्यात
लोणार पोलिसांच्या पाच दिवसांपूर्वी दुचाकी चोरट्यांच्या टोळीला अटक करुन सात दुचाकी जप्त केल्या होत्या या चोरीच्या तपासणीमध्ये आणखी एका आरोपीस 18 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली यामध्ये मराठवाड्यातील सराईत दुचाकी चोर लोणार पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे शहर व तालुक्यातून काही दिवसापासून वाहने चोरी जात असल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे चोरट्यांचा तपास लावणे लोणार पोलिसांपुढे मोठे आव्हान होते परंतु लोणारचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी काही गोपनीय सूत्रांच्या मदतीने दुचाकी चोरट्यांची कनेक्शन उघडकीस आणले आणि मराठवाड्यातील दुचाकी चोरीचा तपास करिता त्यांना गजाआड केले दरम्यान परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी दोन आरोपींना लोणार पोलिसांनी कारवाई करत दुचाकी चोरीचा तपास लावला या दुचाकी चोरट्यांच्या रॅकेटमध्ये लोणार तालुक्यातून तीन आरोपी व दोन आरोपी हे मराठवाडा येथील आहेत या सर्व आरोपींना लोणार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
ऋषिकेश विक्रम नागरे राहणार सावरगाव मुंढे करण राहणार किनी धीरज अवसरमोल राहणार लोणार प्रताप बाजीराव इंगळे राहणार बोरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी गणेशराव काशीराम गायकवाड राहणार बांदरवाडा तालुका पाथरी जिल्हा परभणी अशी आरोपींची नावे आहेत
त्यांच्याकडून आठ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत सर्व वाहने लोणार तालुक्यातच आरोपींनी विक्री केले असल्याचे पोलिसांनी सांगितले यामधील गणेश गायकवाड याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया पोलीस उपनिरीक्षक बजरंग बनसोडे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास पवार यांच्या मार्गदर्शनात लोणार पोलीस अधीक्षक रवींद्र देशमुख करीत आहेत या कार्यवाहीत पोलीस सुरेश काळे रामू गीते चंद्रशेखर मुरडकर बंसी पवार अरुण खनपटे कृष्णा निकम रवींद्र मोरे विठ्ठल चव्हाण गजानन ठाकरे विशाल धोंडगे सुनील केसकर गजानन बनसोडे होते