बुलडाणा,(जिमाका) दि.19: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 463 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 414 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 49 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 48 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 369 तर रॅपिड टेस्टमधील 45 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 414 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 12, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, चिखली शहर : 10, चिखली तालुका : अंबाशी 1, सावरखेड 2, कव्हळा 1, मेहकर तालुका: पिंपळगाव उंडा 1, दे. राजा तालुका : विझोरा 1, सिन गाव जहागीर 2 , बुलडाणा शहर : 5, शेगाव शहर : 4, शेगाव तालुका : मोडखेद 1, जळगाव जामोद शहर : 5, नांदुरा शहर :2, मलकापूर तालुका : धरणगाव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 49 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रो
टोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : सिद्धिविनायक हॉस्पिटल 19, स्त्री रुग्णालय 2, अपंग विद्यालय 1, खामगाव: 2, चिखली : 5.
तसेच आजपर्यंत 83412 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11622 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11622 आहे.
तसेच 1751 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 83412 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12087 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11622 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 320 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 145 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.