26 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 450 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 406 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 36 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 306 तर रॅपिड टेस्टमधील 100 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 406 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : पांगरी 1, पिंपळगांव 2, सागवन 1, बुलडाणा शहर : 2, मेहकर तालुका : डोणगांव 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेंबा बु 2, खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : धामणगांव देशमुख 1, मलकापूर शहर : 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : मिसाळवाडी 1, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : दे. मही 1, नागणगांव 1, सिं. राजा शहर : 4, सि.राजा तालुका : सावखेड तेजन 2, जळपिंपळगांव 1, जळगांव जामोद तालुका : निंभोरा 1, जळगांव जामोद शहर : 7, शेगांव शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 26 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 3, दे.राजा : 17, मोताळा : 1, सिं.राजा : 1, खामगांव : 4.
तसेच आजपर्यंत 77003 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10860 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10860 आहे.
तसेच 1123 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 77003 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11433 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10860 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 437 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 136 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.