कोरोना अलर्ट : प्राप्त 572 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 51 पॉझिटिव्ह 21 रूग्णांना मिळाली सुट्टी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, December 18, 2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 572 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 51 पॉझिटिव्ह 21 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 623 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 572 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 51 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 492 तर रॅपिड टेस्टमधील 80 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 572 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 6, दे. राजा शहर : 5, बुलडाणा शहर : 10,  खामगांव शहर : 1,  सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 2, नागझरी 3, चिखली तालुका : आंधई 1, नायगांव 1, वरखेड 2,  चिखली शहर : 5, मलकापूर शहर: 5, मलकापूर तालुका: धरणगाव 1, खामगाव तालुका: बोथा काजी 1, नांदुरा तालुका : माळेगाव गोंड 1, नांदुरा शहर : 1, शेगाव तालुका: टाकळी 1, मोताळा तालुका: धामणगाव 1, शेलापूर 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 51 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे मलकापूर येथील 50 वर्षीय पुरूष रूग्णाचा  उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 21 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :   बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 7,  नांदुरा : 3, सिं. राजा : 3, खामगांव : 3, लोणार : 3,  चिखली : 2.

तसेच आजपर्यंत 82998 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11593 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11593 आहे.  

  तसेच 1890 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 82998 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12038 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11593 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 300 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 145 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->