बुलडाणा जिल्ह्यात 348 कोरोना आहवाल Buldhana covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, February 16, 2021

बुलडाणा जिल्ह्यात 348 कोरोना आहवाल Buldhana covid-19

                         

       348 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 82 पॉझिटिव्ह

                                        76 रूग्णांना मिळाली सुट्टी

 बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 348 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 176 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 348 अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, गिरडा 1, दहीद 1, चांडोळ 1, चिखली तालुका : हिवरा 1, अमडापूर 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1,  चिखली शहर : 11, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 2, दे. मही 1, दगडवाडी 1, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : गुंधा 1, मुंदेफळ 1, डोणगांव 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : झाडेगांव 1,  मूळ पत्ता मुर्तीजापूर जि. अकोला 1, माहोरा ता. जाफ्राबाद 2,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंजनी खु ता. मेहकर येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 2, अपंग विद्यालय 12, खामगांव : 9, दे. राजा : 17, सिं. राजा : 3, चिखली : 9, शेगांव : 5, मलकापूर : 3,  लोणार : 6, जळगांव जामोद : 1, मेहकर : 8,तसेच आजपर्यंत 115951 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14221 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14221 आहे. 

   तसेच 1067 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 115951      आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15026 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14221  कोरोनाबाधीत रूग्णांनी    कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या     रूग्णालयात 627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 178 कोरोना बाधीतांचा मृत्यू       झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.


Post Top Ad

-->