शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा Buldhana shiv jayanti - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, February 16, 2021

शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा Buldhana shiv jayanti

             

बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : येत्या 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. मात्र यावर्षी कोविड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिवजयंती उत्सव हासाध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनान केले आहे.अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जावून तारखेनुसार 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून शिवजयंती साजरी करतात. मात्र संसर्गजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येवू नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अशा ठिकाणी 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे

 


 त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे व सॅनीटाईज करणे आदींचे पालन करावे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

Post Top Ad

-->