ड्युटीवर रूजू होण्यासाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला;(Accident) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, February 19, 2021

ड्युटीवर रूजू होण्यासाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला;(Accident)

 

मुंबई - ड्युटीवर हजर होण्यासाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा कार-ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात गुरूवारी सकाळी झाला.

सूर्यकांत गायकवाड (वय-54, सहायक उपनिरीक्षक, सीबीडी पोलीस मुख्यालय) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड हे उरण येथे वास्तव्यास होते. दोन वर्षांपूर्वी उरण पोलीस ठाण्यातून त्यांची बदली सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात राखीव विभागात झाली होती. सध्या ते दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. ते आपल्या सोलापूर येथील सलगर वस्ती येथील मूळ गावी गेले होते.

गुरूवारी सुट्टी संपत असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी ते बुधवारी रात्री गावावरून निघाले होते. पाहटेच्या सुमारास इंदापूर मार्गावर भिगवण परिसरात येताच त्यांच्या कारची समोर चाललेल्या ट्रॅक्टरला धडक बसली. धडक जोरदार बसल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला.

गायकवाड हे कार चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते. तर कारमध्ये त्यांचे अन्य दोन मित्र होते. अपघातात कारमधील अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या दोघांची प्रकृती ठीक आहे

Post Top Ad

-->