सेलिब्रेटी म्हटलं की, त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठे सेलिब्रेटी येत आहेत, हे समजले की त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते. तसेच काहीसे मराठी चित्रपटसृष्टीतील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगूरुच्या बाबतीत घडले.
नांदेडमधील सारखनी इथल्या लेंगी महोत्सवाला रिंकूने हजेरी लावली होती. तिथे तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. इतकेच नाही तर तिथल्या लोकांना कोरोनाचाही विसर पडला होता.
परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. त्यामुळे तिची चाहत्यांमधली क्रेझ आजही पहायला मिळते. आज ती कुठेही गेली, तर तिला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळते.