बुलडाण्यात संचारबंदी लागू. शाळा महाविद्यालय बंद buldhana covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, February 17, 2021

बुलडाण्यात संचारबंदी लागू. शाळा महाविद्यालय बंद buldhana covid-19

 

बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश( ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी) जारी केला आहे. याचे कारण म्हणजे आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

अकोला जिल्हाधिकारी यांनी 15 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता बुलडाण्यातही संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

Post Top Ad

-->