मेहकर येथे संत रविदास महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन
(सुनील मोरे मेहकर) बुलडाणा, मेहकर
चर्मकार बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या संत श्री गुरू रविदास महाराजांची जयंती कोरोनाच्या नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.येथील मे. ए.सो.विद्यालयात असलेल्या संत रविदास महाराजांच्या पुतळ्याचे उपप्राचार्य हेमंत कविमंडण, जुगराज पठ्ठे
यांच्या हस्ते पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.
उपस्थितांसमोर छोटेखानी मार्गदर्शनात जुगराज पठ्ठे यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. चर्मकार बांधवांनी विज्ञानवादी होऊन तसेच सामाजिक एकजुटता ठेवून आपली मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी दीपक पहारे, महेंद्र गोवेकर,सुनिल खरात, धनराज चिखलेकर, राम पठ्ठे,राजू पहारे,दीपक परमेश्वर,गजानन शिरे,सचिन मोहरील,दिलीप दुर्योधन या मान्यवरांनी सुद्धा सामाजिक अंतर व कोरोणा नियमांचे पालन करून संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.