(सुनिल मोरे मेहकर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय श्यामभाऊ उमाळकर व अॅड अनंतराव वानखेडे पक्षनेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे गत मेहकर नगर परिषद निवडणूकीचे उमेदवार निलेश उर्फ मुन्ना काळे पाटील यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला.
आज दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी मेहकर विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक शहराध्यक्ष कलीम खान यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाने, माजी नगरसेवक अॅड जगन्नाथ निकस, एनएसयुआयचे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, माजी नगरसेवक संजय म्हस्के, महिला काँग्रेस अध्यक्षा सौ आरतीताई दीक्षित, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष युनुस पटेल, भीमशक्ती विदर्भाचे सरचिटणीस किशोर गवई, युवा नेते आशिष बापू देशमुख, प्रा संजय वानखेडे, रियाज कुरेशी, छोटू गवली, अॅड सि वाय जाधव, मुनाफ खान, सार्थक दीक्षित, धर्मा बनचरे, आकाश अवसरमोल आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे आगामी नगर परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर विश्वास करुन वेगवेगळ्या पक्षातील अनेक पदाधिकाऱी व कार्यकर्ते यांनी मेहकर शहरात काँग्रेस पक्षप्रवेश केलेला आहे, त्यामध्ये आज ही भर पडली आहे.