नागपुरात काय सुरु, काय बंद?; ( Lockdown) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, February 22, 2021

नागपुरात काय सुरु, काय बंद?; ( Lockdown)

(छायाचित्रे संग्रहित )

नागपूर : नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केलं जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागपुरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra Minister Nitin Raut On Corona Virus Nagpur Lockdown Updates)

संपूर्ण विदर्भात तसंच नागपूर शहरात कोरोनाचं संक्रमण वाढतं आहे. दिवसेंदिव अधिक संख्येने कोरोना रुग्ण मिळत आहेत. असं असलं तरी सध्या शहरात लॉकडाऊन लावणार नाही मात्र कठोर निर्बंध लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात जास्तीत जास्त ट्रेसिंग करुन तसंच कोरोना चाचण्या करुन साखळी तोडण्याचं काम आरोग्य विभाग करेल, असं ते म्हणाले.

(छायाचित्रे संग्रहित )

नागपुरात कोणकोणते निर्बंध?

नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद राहतील तसंच मुख्य बाजार पेठ शनिवार आणि रविवारी बंद राहील.

सर्व शाळा महाविद्यालय तसंच कोचिंग क्लासेस 7 मार्च पर्यंत बंद राहतील. तसंच हॉटेल, रेस्टॉरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील. रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील.

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील. शहरातील मंगल कार्यालय 25 फेब्रुवारीपासून 7 मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी लग्न समारंभ उरकावे लागतील. मंगल कार्यालयमध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाही.

नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार. कन्टेन्मेंट झोनमध्ये कठोर निर्बंध लावणार, कोरोनाची संख्या नियंत्रित आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं मंत्री राऊत यांचं आवाहन

नितीन राऊत यांचं सामाजिक भान जपलं

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आणखी कठोर करण्यात येतीय. विदर्भात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये. अशातच मंत्री नितीन राऊत यांनी सामाजिक भान जपत आपल्या मुलाच्या लग्नाचा सोहळा स्थगित केला.


Post Top Ad

-->