ना. डॉ. राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह : प्रकृती ठीक
राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून स्वतःच याची माहिती दिली असून "माझी प्रकृती उत्तम आहे", असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यानी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.