शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहनचालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही,
रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहतुकीमध्ये सुधारणा करायची अत्यंत गरज प्रशासनालाच
उपाययोजना कराव्या लागतील. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जास्त दंड, रस्त्यावर जास्त पोलीस, बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करावा लागेल.
शहरातील वाहतुकीबाबतचे हे मत खुद्द डोणगाव करांनी व्यक्त केले
असून त्यावर त्यांनीच हे उपाय सुचवले आहेत.
प्रवास करताना भेडसावणाऱ्या समस्या
शहरात प्रवास करताना नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात. याबाबत प्रश्नावली तयार करून नागरिकांना विचारण्यात आले. त्यानुसार वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असल्याचे मत ७५ टक्के नागरिकांनी नोंदविले. त्यानंतर बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने,
वाहनचालक, रस्ता ओलांडताना अडचण या समस्या येत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. आहे
त्यामुळे डोणगावातील ग्रामपंचायत प्रशासनाने व पोलीस प्रशासनानीं लक्ष देऊन रस्ता सुरक्षा वाढवावी होणारे वाहतूक कोंडी थांबवली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे