काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील विर पांगरा येथील नितीन राठोड शहीद झाले होते या घटनेला आज एकूण दोन वर्ष पुर्ण झाले आहेत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी लोणार तालुक्यातील वीरपांग्रा येथे विविध मान्यवरांनी व परिसरातील हजारो नागरिकांनी एकत्रित येऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षणार्थ्यांनी आणि मार्गदर्शक गजानन राठोड यांनी पथसंचलन करून एक अनोखी यांच्या वतीने शहीद स्मारकाला सलामी देण्यात आली,
जब तक सुरज चांद रहेगा तब तक नितीन राठोड तुम्हारा नाम रहेगा अमर रहे अमर रहे च्या घोषवाक्याने वीर पांगरा परिसर दणाणून गेला होता,.
या कार्यक्रमासाठी शहीद जवान नितीन राठोड मित्र मंडळ व यांचे वडील शिवाजी राठोड आणि त्यांचे बंधू प्रवीण राठोड सह गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले,