डोणगाव येथील स्थानक प्रशासन सुस्त नागरिक मात्र मस्त
डोणगाव येथील स्थानिक पोलिस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन व या संबंधित प्रशासन हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे कुठल्याच नियमाचे पालन होताना डोणगाव येथे तरी मात्र दिसून येत नसूनही मात्र ही बाब अत्यंत चिंताजनक आहे जिल्हाभरात काही ठिकाणी कडक नियम व अटी घालण्यात आल्या असून काही ठिकाणी तर लॉकं डाउन सुद्धा जाहीर करण्यात आले काही ठिकाणी नऊ ते पाच दुकाने बंद वेळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे काढून देण्यात आली होती
मात्र डोणगावया ठिकाणी त्या आदेशाची अमल बजावणी करतांना दिसून येत नाही स्थानिक पोलीस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याच प्रकारची कारवाई न करता फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला कळवत आहे मात्र प्रत्यक्षात काय स्थानिक प्रशासन आपली जबाबदारी पार पडत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे डोणगावला हा येणारा काळ हा संकटाचा काळ ठरू शकतो की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे
डोणगाव येथे 5:30 पर्यंत सर्वच प्रतिष्ठाने उघडे होते..!