शहरातील आंबेडकर नगर स्थित डोसानी यांच्या गोडाऊन मध्ये धाड़सी चोरी 2 लाख 22 हजार रूपयांचा माल लंपास
( मेहकर,सुनिल मोरे )
मेहकर शहरातील भरवस्तीत असलेल्या आंबेडकर नगर मधील पान मसाला विक्रेते डोसानी यांच्या गोडाऊन मध्ये धाडसी चोरी अज्ञात चोरांनी करून दोन लाख 22 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार शहरातील इमामबाडा चौकात असलेल्या तवक्कल तवाक्कल एजन्सीचे मालक अब्दुल माजिद अब्दुल अजीज डोसानी यांच्या आंबेडकर नगर गोडाऊन मध्ये असलेल्या पानमसाला बिडी सिगरेट व गायछाप तंबाखू इत्यादींचा माल ठेवलेला होता,
अज्ञात चोरांनी करून दोन लाख 22 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना
दिनांक 15 2 2020 ला गोडाऊन लॉक करून अब्दुल माजिद ते आपल्या घरी गेले व दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या एका नातेवाईक रुग्णाला घेऊन उपचारासाठी बुलढाणा येथे केले त्यानंतर आज सकाळी जेव्हा अब्दुल माजिद हे गोडाऊन जवळ गेले तेव्हा त्यांना गोडाऊन चा दरवाजा वाकलेला दिसला त्यांनी आत जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये गायछाप तंबाखू उंटछाप बिडी व गोल्डफ्लेक सिगरेटचे बॉक्स आढळले नाही हे सर्व पाहून त्यांनी तात्काळ मेहकर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून व शेजारील सत्यजित अर्बन च्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये काही चोरटे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेरबंद झाले या चोरीमध्ये गायछाप तंबाखू एकूण पंधरा कट्टे किंमत अंदाजे 1 लाख 2 हजार,ऊंट छाप बीडीचे सहा कार्टून किंमत अंदाजे एक लाख दोन 2 हजार,गोल्ड फ्लेक सिगरेट चे 4 बॉक्स किंमत अंदाजे 18 हजार रुपये असा माल चोरीस गेला आहे,मेंहकर पोलिसांनी अब्दुल माजिद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 461,380 नुसार गुन्हा दाखल केला असून,सत्यजीत अर्बन च्या सीसीटीव्ही फुटेज वरुन काही संशयीत आरोपींना ताब्यात घेणे सुरु आहे,या प्रकरणाचा पुढील तपास ठानेदार आत्माराम प्रधान करीत आहेत.