रुग्णालयातून केले बाळाचे अपहरण (nashik government hospital) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, February 16, 2021

रुग्णालयातून केले बाळाचे अपहरण (nashik government hospital)

 


नाशिक,  दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून एका दीड वर्षीय बालिकेचे अपहरण करून फरार झाला होता. अखेर मंगळवारी सकाळच्या सुमाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालय समोरून ताब्यात घेत त्या बालिकेची सुटका केली आहे.

माणिक सुरेश काळे असं या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा फुलेनगर शनी मंदिर येथे राहणारा असून त्याने दोन दिवसांपूर्वी एका बलिकेचे अपहरण केले होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी माणिक काळेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे माणिक काळेवर दुखाचा डोंगर कोसळला होता. नैराश्याने घेरलेल्या माणिक ला आपल्याला आता आधार कुणीच नाही, अशी भावना निर्माण झाली होती. आपल्याला कुणी तरी आधार मिळावे म्हणून माणिकने बालिकेला उचलून नेल्याचे सांगितले.बाळाचे अपहरण केल्यानंतर त्याने बाळाला फुलेनगर येथील घरी देखील 2 दिवस ठेवले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.दरम्यान, सोमवारी रात्रीपासून त्या चिमुरडीला खोकला येत असल्याने मंगळवारी सकाळी संशयित माणिक काळे हा तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पायी चालत घेऊन जात होता.त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने सुरेश काळेला सीबीएसजवळ ताब्यात घेतली. त्याची अधिक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post Top Ad

-->