डोणगाव बस स्थानकावरून खाजगी प्रवासी वाहतूक
मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग,डोणगाव बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतूकदार आणि त्यांच्या दलालांचा विळखा पडला असून संबंधितांची दादागि. महामार्गावर बसस्थानक, असलेले डोणगाव बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतूकदार आणि त्यांच्या दलालांचा विळखा पडला असून संबंधितांची दादागिरी पराकोटीला जाऊनही पोलीस यंत्रणेने आपण जणू त्या गावचे नाही, असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. वास्तविक, बस स्थानकांसभोवतालचा २०० मीटरचा परिसर उच्च न्यायालयाने ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास मज्जाव आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तिकीटांची नोंदणीला प्रतिबंध आहे. असे असुनही सर्वत्र खासगी प्रवासी वाहतूकदार व दलालांचा सुळसुळाट असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याकडे पोलीस यंत्रणेना कानाडोळा केल्यामुळे दलालांकडून एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्यासारख्या घटना नाकारता येणार नसल्याचे आरोप केला जात आहे.
राज्य महामार्गावर असलेल्या रस्त्यावरील डोणगाव बसस्थानकात
बस स्थानक परिसरात एसटी कर्मचारी सुरक्षित नसल्याचे दर्शविले आहे. अनेक बसस्थानकांत खासगी वाहतुकदारांच्या दलालांचा सुळसुळाट होण्यास स्थानिक पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांमध्ये होत आहे . स्थानकां समोरून घुसखोरी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून आरडाओरड करून प्रवासी पळविले जातात, मात्र बाहेर गावाहून आलेले वाहक व चालक फारसे काही करू शकत नाहीत. ज्या कर्मचाऱ्याने शांततेच्या मार्गाने विचारणा करण्याचा प्रयत्न केला, वास्तविक, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या सभोवतालचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर केला आहे. खासगी प्रवासी वाहतुकदार एसटी महामंडळाचे प्रवासी पळवून नेऊ नये म्हणून २०० मीटरच्या परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी केली जाऊ नयेत म्हणून निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात खासगी प्रवासी वाहतुकदारांना प्रवासी नोंदणी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमबजावणीची जबाबदारी स्थानिक पोलीस यंत्रणेची आहे. ही अंमलबजावणी होत नसल्याने खासगी प्रवासी वाहतुकदार आणि दलालांचे फावले असल्याचे दिसून यांनी येत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे
डोणगाव बसस्थानक या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन कार्यालय
आहे. या ठिकाणी महामार्गावर स्थानकासमोर खासगी वाहनाने उभ्या करून प्रवासी पळविण्याचे काम चोवीस तास सुरू असते. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी वाहनांना मुळे शहराची वाहतूक व्यवस्था वेठीस धरली जाते. काही वेळी तर पोलिसांच्या समोरून सुद्धा बसस्थानकावर अवैध वाहतूक ही स्थिती असल्यास इतर बसस्थानकांचा विचार न केलेला बरा, अशी प्रवासी वर्गाची प्रतिक्रिया आहे.
खाजगी वाहतूक करणारे व त्यांचे दलाल आम्ही सांगायला गेलो तर आमच्यावरच दादागिरी करतात नियमानुसार बस स्थानकापासून दोनशे मीटरच्या अंतर्गत कुठ ही खाजगी वाहनांमध्ये प्रवासी नेता येत नाही याप्रकरणी आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासन यांना कळवतो मात्र यावर काहीच पर्याय आतापर्यंत निघाला नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे व ग्रामपंचायतींनी सुद्धा साफसफाई करावी
डी जी इगळे वाहतूक नियंत्रण डोणगाव