आईसह मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किमी अंतरावर असलेल्या हतेडी खुर्द गावातील एका महिलेने तिच्या आठ ते दहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 मार्च रोजी उघडकीस आली दरम्यान या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे रूपाली हरिदास चव्हाण आणि समर्थ हरिदास चव्हाण अशी या घटनेतील मृतकांची नावे आहेत 17 मार्च रोजी ते शेतात काम करण्यासाठी गेले होते मात्र परत आले नाहीत त्यांचे पती हरिदास व नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत दरम्यान 18 मार्च रोजी दोघांचेही मृतदेह गट नंबर 24 मधील सिताराम चव्हाण यांच्या विहिरीत तरंगताना आढळून आले याची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे
दोघांही मृतकांची पार्थिव पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढले असून उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी सध्या बारकाईने चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले