( तहसीलदारांना निवेदन देताना सर्व मुस्लिम समाज धर्म गुरु हजर होते. )
वसीम रिझवी यांच्यावर त्वरित कारवाई करा
मुस्लिम समाजाचे धर्म गुरु यांचे नेतृत्व तहसीलदार यांना निवेदन
APALA VIDARBH LIVE साज़िद शेख़-------कारंजा वाशिम
कारंजा लाड – उत्तर प्रदेश चे शिया वक़्त बोर्ड चे पूर्व अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलीकडेच माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र अशा धर्मग्रंथ कुरान शरीफमधील 26 आयतें कमी करण्याची मागणी केली आहे, परंतु मुस्लिम धर्माचे पवित्र कुरान शरीफ मधील आयतें कमी करण्याचा अथवा बदलण्याचा अधिकार कोणाला ही नसुन पवित्र कुरआन शरीफच्या आयतें मध्ये बदल करण्याची मागणी करून वसीम रिझवी नी मोठा गुन्हा करून आपला मानसिक संतुलन आणि बौद्धिक दिवाळखोरी गमावल्याचा पुरावा दिला आहे. मुस्लीम सेवा संघाने वसीम रिझवी यांच्याविरोधात माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून वसीम रिझवी चा कडक शब्दात निषेध केला आहे
जामा मस्जिद चे इमाम मौलाना अब्दुल मजीद म्हणाले की, सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वोत्कृष्ट, अल्लाहने आपल्या भव्य दिव्य वाणीद्वारे जगातील सर्व मानवांना अत्यंत आदरणीय कुरान शरीफ यांच्याद्वारे संबोधित केले, या पृथ्वीवर मानवजातीच्या जीवनातील सर्व जीवन पात्र आहे. हे केले गेलेले शेवटचे पुस्तक आहे, त्यास सोडले जाऊ शकत नाही.
वसीम रिझवीसारखे लोक जातीधर्माच्या नावाने लोकांना विभाजित करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत, वसीम रिझवी चे हे कृत्य अत्यंत घृणास्पद असुन ह्यामुळे मुस्लिम बांधवांच्या निश्चितच भावना दुखावल्या गेल्या असुन केवळ अज्ञानापायी व व्देषबुध्दी ने केलेले हे कृत्य कदापि माफ होऊ शकणार नाही प्रत्येक व्यक्ती कुरान शरीफच्या माध्यमातून अल्लाह शी जुडलेला आहे सर्व जातीधर्माचे लोक कुरान शरीफ यावर विश्वास ठेवणारी असुन संपूर्ण मानवजाती च्या आयुष्यात आलेला अकाली असत्यरुपी अज्ञानाचा अंधकार क्षणार्धात नष्ट करण्याचे सामर्थ्य, पवित्र कुराण शरीफ मध्ये आहे अश्या पवित्र ग्रंथाशी वसीम रिजवी सारखा विशुद्ध मनाचा माथेफिरू व्यक्ती छेडछाड करण्याची भाषा करीत असेल तर मुस्लिम सेवा संघ कदापि खपवून घेणार नाही यांच्या टिप्पणीशी आम्ही कधीही सहमत होणार नाही,
ह्यावेळी माननीय तहसीलदारांना निवेदन देताना सर्व मुस्लिम समाज धर्म गुरु हजर होते.