(छायाचित्रे संग्रहित)
येत्या 27 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत तब्बल आठ दिवस बँक बंद राहणार आहेत मार्च एंडिंग व एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांना बँक बंद चा चांगला फटका बसणार आहे त्यामुळे व्यापारी शेतकरी नोकरदार वर्ग आजारी व्यक्ती जनसामान्य नागरिकांना या बँकेच्या सुट्ट्या च्या आधी सर्व कामे करावी लागणार आहे
बँकेला 27 मार्चला शनिवारी सुट्टी आहे 28 मार्चला रविवारी आहे 29 मार्चला सोमवारी होळीची सुट्टी तर बुधवारी 31 मार्चला वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकेला सुट्टी आहे गुरुवारी1 एप्रिल ला नॉन बँकिंग डे आहे 2 एप्रिल ला शुक्रवारी गुड फ्रायडे ची सुट्टी आहे शनिवारी तीन आणि रविवारी 4 एप्रिलला बँकेला सुट्टी आहे त्यामुळे सलग आठ दिवस बँक बंद राहणार असल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे एवढ्या मोठ्या कालावधीत बँक व्यवहार बंद राहणार असल्याने नागरिकांना मोबाईल ॲप च्या साह्याने डिजिटल व्यवहार करता येईल तसेच एटीएममधून व्यवहार सुरू राहतील