( छायाचित्र संग्रहित )
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असणारे डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत शेलगाव येथिल चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या आरोपी पतीला न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.
शेलगाव देशमुख येथील गणेश भिकाजी पहारे यांने यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून खून केला होता . या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस खोठडी सुनावली होती . मात्र त्याची पोलीस कोठडी संपल्याने ६ मार्च रोजी आरोपी गणेश पहारे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. मात्र या पती-पत्नीच्या वादात पाच चिमुकल्यांचे पहिले आईचे आणि नंतर वडिलांचे छत्र हरवले असून यात माझा काय दोष असा प्रश्न आता मात्र नक्कीच त्या चिमुकल्या जिवांना पडला आहे