सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना Buldana --(suneche kanyadan) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, March 8, 2021

सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना Buldana --(suneche kanyadan)

(छायाचित्रे संग्रहित )

 बुलडाणा | बुलडाण्यात सासू सासऱ्यांनी सूनेचं कन्यादान केलं आहे. आपल्या सुनेचं कन्यादान करून त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या ठिकाणी ही घटना घडली.

सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाचा धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा उमाळे यांच्यासोबत 16 मार्च 2020 रोजी विवाह झाला होता. मात्र दुर्देवाने 31 ऑगस्ट 2020 ला संतोषचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर राधा ही आपल्या सासू सासऱ्यांकडे राहत होती. तिचे सासरे शालिग्राम वानखडे आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. राधा सात ते आठ महिने सासरी राहत होती. काल राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार यांच्याशी करण्यात आला आहे.

दरम्यान, हा विवाह नोंदणी पद्धतीने आयोजित केला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह पार पडला. हा विवाह सोहळा सुनगाव येथे पार पडला.

Post Top Ad

-->