मेहकर तालुका काँगेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन
विशेष प्रतिनिधी सुनील मोरे मेहकर
आज दिनांक ८मार्च रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या निर्देशानुसार पेट्रोल, डिझेल,गॅस व वाढत्या महागाई विरुद्ध केंद्र शासन व त्यांच्या प्रशासनाच्या विरोधात मेहकर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष देवानंद पवार आणि नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य "आक्रोश आंदोलन" करण्यात आले होते. सदर आंदोलनास जानेफळ चौकातून सुरवात करण्यात आली होती.आणि शेवटी एसडीओ कार्यालायात जाऊन तेथे केंद्र शासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध निषेदाचे निवेदन देण्यात आले .सकाळी ११ वाजता सुरु करण्यात आलेल्या या आंदोलनात सायकलचा ही सहभाग नोंदविण्यात आला होता.या वेळेस केन्द्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात कोरोना मुळे जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी न बोलविता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थिती हे आक्रोश आंदोलन घेण्यात आले होते व पदाधिकाऱ्यांनी मास्क लावून सहभाग नोंदविला होता.
या वेळेस या आंदोलनाला वसंतराव देशमुख, पंकज हजारी, गजेन्द्र माने, निलेश मानवतकर, आलियार खान,निलेश सोमण, संजय ढाकरके,मुजीब खान,उस्मान शहा, अनिल चांगाडे, स्मित सावजी, अजगर शेख, सलमान शेख,मनोज गोरे, प्रल्हाद, इत्यादी ची उपस्थिती होती.