( छायाचित्र संग्रहित )
BREAKING : नागपूरमध्ये विको कंपनीला भीषण आगनागपूर : नागपूरमधील एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध विको कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची व्हिडीओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन दलाच्या गाड्या कंपनीत दाखल झाल्या आहे आग अजून आटोक्यात आलेली नाही घटना स्थळी उपस्थित असलेले अग्निशामक दल या आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयन्त करत आहेत.
एमआयडीसी(हिंगणा)तील विको कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्यापही समोर आलेले नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आग आणि धुराचा लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात एकच तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस पथक आणि आरोग्य सेवेत दाखल झाले आहे गटनासथळी आग आटोक्यात आणल्यानंतर या परिसरातील माहिती समोर येइल.