डोणगांव येथील सौ कमल रमेश खोडके वय ४२ वर्ष ही महिला शेतकरी आपल्या शेतातील धुऱ्यावरील माती मजुरांकडून शेतात टाकत असताना आरोपीतांणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना ३ मार्चच्या १ वाजता दरम्यान घडली.
हकिकत अशाप्रकारे आहे की यातील नमूद फिर्यादी ह्या त्यांचे पती चे शेत वहाती करते त्यांचे शेताला लागूनच नमूद आरोपीचे शेत आहे नमूद घ ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी ही आरोपीतानी फिर्यादीचे धूरयावरील खोदून नेलेली माती फिर्यादी ही मजुरां सह फिर्यादीचे शेताचे धुर्यावर मजुरांकरवी टाकत असताना यातील आरोपीत्यांनी धूरयावरील माती नेण्याचे कारणावरून फिर्यादी ही महार जातीच्या आहेत हे माहीत असताना फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले व फिर्यादीचा वाईट उद्देशाने हात धरून तिच्या साडीचा पदर खाली खेचून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मजुरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशा रिपोर्ट आरोपी , अरुण विठोबा काळे ,पवन उर्फ गोलू अरुण काळे , सौ लिलाबाई अरुण काळे ,विजय विठोबा काळे सर्व रा डोणगाव ता मेहकर गुन्हा दाखल करण्यात आला तपास मा उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर यांचेकडे