संचारबंदी काळातही वाहनांची रस्त्यावर वर्दळ.
वाढते कोरोना प्रादुर्भाव पाहता संचार बंदीच्या काळात महसूल विभाग,शहरात नगर पालिका विभाग,गांव पातळीवर ग्राम पंचायत या सर्वांनी पोलीस विभागा सोबत रस्त्यावर उतरून कार्यवाही करण्याची गरज.
कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या वतीने शनिवार ६ वाजता पासून तर सोमवार सकाळी ८ वाजता परियानंत संचारबंदी आहे यात रविवार हा संपूर्ण दिवसांसाठी संचारबदी आहे. मात्र नागरीक हे आदेश न जुमानता मोठ्याप्रमाणावर दुचाकीवर संचार करताना आढळून आले. एका ६ मार्च रोजी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक ८३७ बाधित रुग्ण आढळून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या रोगाचा प्रसार होत असताना नागरिकांमध्ये अजूनही जागरूकता दिसून येत नाही.आज संचार बंदी दरम्यान शासनाच्या परवानगीने सुरु असलेली दुकानेेे सोडून इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद होती. अति महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केल्यानंतर सुद्धा आज नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी,चारचाकी वाहनांसह फिरताना आढळून आले.या दरम्यान मेहकर येथे पोलीस स्टेशन समोर नगरपालिकेचे काही शिक्षक व दोन पोलीस कर्मचारी,विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी वाहन धारकांवर तसेच बिना मुखाच्छादन फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत होते.अशी कार्यवाही संपूर्ण जिल्ह्यात शहरा सोबत ग्रामीण भागात सुद्धा व्हायला हवी ज्यात जिल्हा परिषद शिक्षक व नगर पालिका शिक्षक यांच्या मार्फत जनतेची कोरोना लस संबंधी असलेला गैर समज दूर करण्या साठी जनजागृती तर नगर पालिका,ग्राम पंचायत व महसूल विभागाच्या मार्फत पोलीस प्रशासन सोबत राहुब संचार बंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणार्यावर तसेच कोरोना संबंधी नियम न पाळणार्यावर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झालेली आहे ज्याने कोरोना आटोक्यात येईल सध्या संचार बंदी ही निष्फळ ठरत असल्याची दिसून येते ज्यात फक्त दुकाने बंद आहे जनता मात्र रस्त्यावर बिनधास्त दिसून येते.
मेहकर तालुक्यातील महत्त्वाचे ठीकाण माणल्या जाणारे म्हणजे डोणगाव मध्ये तर नाही महसूल प्रशासन नहीसे झाले तर ग्रामपंचायत प्रशासन फक्त दौंवडी तच गुंतले नाही पोलीस प्रशासन मात्र कसे का होना एक राऊंड मारतातच मात्र कारवाई साठी बोलूच नका हो असे एकंदरीत गत डोणगाव स्थानिक प्रशासनाची झालेली आहे
दुचाकी वाहन धारकांवर तसेच बिना मुखाच्छादन फिरणाऱ्या वर कारवाई करताना पोलिस कर्मचारी.