लुटी मधला ट्रक जप्त,आरोपीची अटकपूर्व जमीन रद्द.
( APALA VIDARBH LIVE सुनिल मोरे मेहकर )
एक महिन्या पूर्वी मेहकर येथील कंचणी महाला जवळ ट्रकला अडवून ८ लोकांनी १५ लाखाचा वाळू भरलेला मालवाहू ट्रक लुटला होता.
मेहकर पासून जवळच असलेल्या जानेफळ रोडवरील कंचणी महालाजवळ एक महिन्या पूर्वी आठ आरोपितांनी रेती भरलेला मालवाहू ट्रकच्या समोर वाहन आडवे लावून ट्रक पळविला होता या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती तेव्हा मेहकर पोलिसांनी परभणी येथून आरोपीच्या घरा समोरून ट्रक जप्त करून आरोपीने घेतलेली अटक पूर्व जमीन सुद्धा रद्द न्यायालयाकडून रद्द करून घेतली.
मेहकर येथून एक महिन्या पूर्वी जानेफळ रोडवरील कंचणी महालाच्या जवळ आरोपी आरिफोद्दीन व त्याचे सात साथीदार यांनी ट्रक क्रमांक एम एच ३८ डी ८९९९ या ट्रक समोर आडवे वाहन लावून ट्रक अडवला आणि चालकाच्या ताब्यातील ट्रक लुटून नेल्याची घटना घडली होती याची फिर्याद अलीमोद्दीन रा हिंगोली जी वाशीम यांच्या फिर्यादी वरून १५ लाख ६० हजाराची जबरी लूट करून वाळू भरलेला ट्रक लुटून नेल्या बद्दल कलम ३९५,३४२,८०६ नुसार गुन्हा नोंद केला मात्र यातील मुख्य आरोपी आरीफोद्दीन याला मेहकर न्यायालयाने अटकपूर्व जमीन दिली होती यावर मेहकर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी ए पी आई युवराज रबडे ,पोहेका खालिद खान,पोलिस नायक विजय बेडवाल यांची एक टीम बनवून ट्रकचा शोध घेतला असता संबंधित लुटीतला ट्रक हा आरोपीच्या घरा समोर उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या वरून मेहकर पोलिसांनी परभणी पोलिसांच्या मदतीने ३ मार्च रोजी हा ट्रक हस्तगत केला व आरोपी आरीफोद्दीन राहणार परभणी यास मिळालेली अटकपूर्व जामीन मेहकर नायल्याकडून रद्द करून घेतली.
यातील आरोपींचा शोध मेहकर पोलीस घेत असून लवकरच यातील सर्व आरोपीस अटक करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी दिली.