होळी, धुलीवंदन उत्सव साधेपणाने साजरा करा HOLI WASHIM - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, March 28, 2021

होळी, धुलीवंदन उत्सव साधेपणाने साजरा करा HOLI WASHIM

 होळी, धुलीवंदन उत्सव साधेपणाने साजरा करा


मिरवणूक, मोठे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास मनाई
#APALA VIDARBH LIVE
वाशिम, दि. २७ (जिमाका) : होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
होळी/शिमगा या सणानिमित्त एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर वाढलेला असल्याने त्यात वाढ होवू नये, यासाठी धुलीवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आवश्यक ती जनजागृती, प्रबोधन करावे.
होळी व धुलीवंदन या उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. होळी, धुलीवंदनाचे सण गर्दी करून साजरे होणार नाहीत, याची खात्री ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीने व नागरी भागात नगरपालिकेने करावी. पोलिसांनी स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे व आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी. शिवाय पोलिसांनी स्थानिक संस्थांनी मदत मागितल्यास तातडीने मदत करावी, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जारी केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध मा. मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांचे कडील आदेश क्रमांक डीएमयु/२०२०/डीआयएसएम-१, दि. २९ जुळे २०२० मधील परिशिष्ट ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (१८६० चे ४५) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाही संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->