मेहकर बसस्थानकातील गुणिया पार्सल कार्यालयाचे संतोष अवस्थी यांच्यातर्फे आज महाशिवरात्रीनिमित्त एस टी प्रवाशांना साबुदाणा उसळ चे वितरण करण्यात आले.बसस्थानकात सार्वजनिक पणपोईचेही उदघाटन करण्यात आले.
दरवर्षी महाशिवरात्री निमित्त संतोष किसनप्रसाद अवस्थी यांच्या वतीने बसस्थानकात प्रवाशांना उपवासाच्या फराळाचे वितरण करण्यात येते.आज फराळ वितरणाचा प्रारंभ सहायक वाहतूक अधिक्षक हरीष नागरे,कार्यशाळा अधिक्षक हर्षल साबळे,लेखाकार अशोक चांदणे,वरिष्ठ लिपिक नागेश कांगणे , सहायक वाहतूक निरीक्षक समाधान जुमडे,नियंत्रक पी के शिंदे, रउफखान पठाण, नामदेव दशरथे ,संतोष अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक पाणपोई चे आज सकाळी उदघाटन करण्यात आले.अंकुश शिंदे,विनोद चेके,अनिल साळवे,अमोल मते आदी यावेळी उपस्थित होते.