महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते राजभवनात सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रीय सेवा सम्मान 2021 पुरस्कार प्रदान
APALA VIDARBH LIVE सुनिल मोरे मेहकर
8 मार्च जागतिक महिलादिनाच्या औचित्यावर राजभवन मुंबई येथे गऊ रक्षक सेवा ट्रस्ट मुंबईचा 6 वा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय पातळीवर सेवा कार्य करीत असलेल्या विविध क्षेत्रातील समाज सेवकांचा राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार देऊन मा. महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या मध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्य़ातील सावित्री,जिजाऊचा वारसा चालविणारी धाडसी,शूरतेजस्विनी लेक / कन्या सर्पमित्र वनिता बोराडे वने ,वन्यजीव,निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात ,पर्यावरण हेच प्राणसंजीवन,हे ब्रिद घेऊन मागील 30 वर्षापासुन सापांचा व लोकांचा जिव वाचवण्याचे सेवा कार्य करीत आहे. वन्य प्राणी व पर्यावरण संरक्षण संवर्धन व संशोधन करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला ठरल्या असून जागतिक पातळीवर 51000 हजार पेक्षा जास्त सापांना जीवदान देण्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदविला आहे . त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या डाक विभाकडून टपाल तिकीट यापूर्वीच जारी करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण, वन विभाग महाराष्ट्र राज्य ,यांनी वृक्ष लागवड व संरक्षण पर्यावरणीय सेवाभावी कार्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. पर्यावरण, संरक्षण व प्रदूषण मुक्ती हि जागतिक स्तरावर आजच्या काळाची गरज झाली आहे.
जागतिक तापमानवाढ,प्रदूषण,पाणीटंचाई , दुष्काळ ,भूकंप, पुर,वादळवारा निसर्ग सृष्टीचा नाश करणारे महाभयंकर आगीचे वनवे, जंतू संसर्गजन्य साथीचे आजार अर्थात करोना महामारी या सर्व पर्यावरणीय समस्यांच्या निर्मूलनासाठी अविरत काम करून सर्पमित्र वनिता बोराडे आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारत देशाचे पर्यावरण सेवीका म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच्या या पर्यावरण व विश्वशांती कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.वर्ल्ड कॉस्टुटिशन अॅन्ड पारल्मेंट असोशियन अमेरिका यांनी त्यांना आजीव सदस्यत्व दिले आहे.तसेच युनायटेड नेशन्सच्या UN75 हेल्थ प्लॅनेटवर त्यांची नियुक्ती झाली आहे.2026 च्या नासा मार्क्स मिशन मोहिमे अंतर्गत पाठविण्यात येणाऱ्या मंगळ यानावर जगातील पहिली महिला पर्यावरण सेवीका,सर्परक्षक, सर्पमित्र म्हणून त्यांचा सचित्र कार्य वृतांत छापण्यात आला आहे.विश्वशांतिदुत डाॅ.सुधीर तारे यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांचा नासा मार्क्स मिशन 2026 चा बोर्डीग पास ईमेल द्वारे पाठविला आहे.आदरनिय विश्वशांतिदुत डाॅ.सुधीर तारे हे वनिता बोराडेचे मार्गदर्शक असून खंबीर पुरस्कर्ते आहेत.त्यांच्या सहयोगामुळेच मी आत्तापर्यंतचा प्रवास करीत असल्याचे वनिता बोराडे यांनी नम्र पणे सांगितले. एक सर्व सामान्य गृहिणी ते जगातील पहिली महिला सर्परक्षक होण्याचा बहुमान आज वनिता बोराडे यांना प्राप्त झाला असून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 2021 करीता त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे.या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून भारताचे महामहिम राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खास समारंभात नोबेल पुरस्कारासाठी नामाकंन प्राप्त महाराष्ट्राची सर्प महिला म्हणून ओळखल्या जाणारी पर्यावरण संरक्षक महिला म्हणून त्यांची निवड करण्यात आली या गौरवासोबतच त्यांना राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान केला.राजशिष्ठाचाराचे व करोना प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोरपणे या समारंभात पालन करण्यात आले.
सर्व पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना राज्यपालांनी आपत्कालिन परिस्थितीत सर्वानि राष्ट्रहिताला प्राधान्य देत ऐक्याने व धैर्याने संकटांवर मात करण्याचा संदेश दिला.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी नारी शक्ती ला सलाम केला.समारोपा मध्ये गऊ रक्षक सेवा ट्रस्ट मुंबई चे कार्यवाहक तथा जनरल सेक्रेटरी सुविख्यात समाजसेवक श्री संजय शर्मा (अमान ) यांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.अतिशय शिस्तप्रियतेत राजशिष्टाचारा चे पालन करीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ व समारोप राष्ट्रगीता ने करण्यात आला.