(छायाचित्रे संग्रहित )
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे (Nagpur Corona Virus Update). एकीकडे लसीकरणाने जोर पकडला असला तरी रोज येणारी रुग्ण संख्या चिंता वाढवत आहे. नागपूरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे (Nagpur Corona Virus Update COVID Patients Increases Day By Day).
राज्याची उपराजधानी कोरोनाच्या विळख्यात आहे. दररोज नागपूरात हजारच्यावर नवे रुग्ण निघत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात दुसऱ्यांदा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाली आहे. 100 ते 200 च्या घरात असलेला आकडा आता हजाराच्य घरात पोहोचला आहे.
एकीकडे लसीकरण होत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे टेस्टचं प्रमाण सुद्धा वाढविण्यात आलं आहे. शहरात 14 तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यानुसार, शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले. मात्र, रस्त्यावर विनाकामाने फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. अशा विनाकामाने फिरणाऱ्यांना महापौरांनी चांगला सल्ला दिला.